जी.ए. ,कवी ग्रेस आणि इंग्लिश कवी P.B.Shelley
प्रस्तुती - श्रीनिवास हवालदार
जी.ए. ने कथा ‘ऑर्फियस’ मध्ये मृत्यूबद्दल सखोल विवेचन करून त्यांचे मत व्यक्त करताना म्हटले आहे की क्षणभंगुरतेने माणसाचे मन विषण्ण होण्याचे कारण नाही. आपला प्रवास अगदी तात्पुरता आहे आणि या वाटेने पुन्हा येण्याची संधी मिळणार नाही हे समजूनच सुखाचा उपभोग घ्यायला हवा.
कवी ग्रेस आणि इंग्लिश कवी P.B.Shelley च्या खालील कविता चोखंदळ रसिकांने वाचल्या तर त्यांचे आणि जी.ए.च्या दृष्टिकोनातली समानता लक्षात येईल.
मुलगी [राजपुत्र आणि डार्लिंग] -ग्रेस
आयुष्य नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा
हा प्रश्न नसतो.
वाळूतील पाण्यासाठी घरकुले असतात.
ती बांधावीत; समजुतदारपणाने पुन्हा
त्यांची वाळू गोळा करून
ठेवावी.
मी केरळात होतो तेह्वा एक मुलगी भेटली.
त्या वेळी जुन्या चर्चच्या दुरुस्तीचे काम
सुरु होते. इटालियन संगमरवराच्या एका
तुकडयाशेजारी ती उभी होती.
फुले तोडावीत,फार तर ऋतूंच्या आविर्भावातील
सूक्ष्म फरकांची नोंद घ्यावी.
बस्स, एव्हढेच.
एक दिवस कुठलीही पूर्वसूचना न देता
ती मरून गेली.
साधे आहे इतकेच!
या कवितेत मानवी जीवनाच्या क्षणभंगुरते कडे लक्ष्य वेधले आहे. जेवण आणि मरण या दोन्ही गोष्टींवर माणसाचे नियंत्रण नाही. त्याच्या इच्छा आणि आकांक्षाही वाळूच्या घरकुला प्रमाणे भंगुर असतात. आकांक्षा ठेवाव्यात पण त्या पूर्ण होतीलच याची खात्री नाही.हे ध्यानांत ठेवणे शहाणपणाचे आहे.त्यांना केरळात भेटलेली मुलगी सुंदर असून आवडली होती पण अचानक मरण पावली.तिला कोणी वाचवू शकले नाही. अशा घटना घडल्यावर असे वाटते की आपण फक्त ईश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीतले सौंदर्य अनुभवावे आणि सृष्टीत जे परिवर्तन तो घडवून आणतो आहे ते बघावे.या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.
इंग्लिश रोमांटिक कवी P.B.Shelley ची Mutability ही कवितादेखील हेच संकेत देते :
The flower that smiles today
Tomorrow dies;
All that we wish to stay
Tempts and then flies;
What is this world's delight?
Lightning, that mocks the night,
Brief even as bright.--
Virtue, how frail it is!--
Friendship, how rare!--
Love, how it sells poor bliss
For proud despair!
But these though they soon fall,
Survive their joy, and all
Which ours we call.--
Whilst skies are blue and bright,
Whilst flowers are gay,
Whilst eyes that change ere night
Make glad the day;
Whilst yet the calm hours creep,
Dream thou - and from thy sleep
Then wake to weep.
- P. B. Shelley
Comments
Post a Comment